बिर्‍हाड आंदोलन पोहोचले विधान परिषदेत

By Admin | Updated: March 20, 2015 23:59 IST2015-03-18T00:07:44+5:302015-03-20T23:59:17+5:30

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला प्रश्न उपस्थित, आंदोलकाचा मृत्यू

Birhad movement reached the Legislative Council | बिर्‍हाड आंदोलन पोहोचले विधान परिषदेत

बिर्‍हाड आंदोलन पोहोचले विधान परिषदेत

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला प्रश्न उपस्थित, आंदोलकाचा मृत्यू
नाशिक : गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या बिर्‍हाड आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, आंदोलकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने व दुसर्‍याला स्वाइन फ्लूसदृश आजार झाल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत. २२ व्या दिवशी कोणतेही आश्वासन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांचे बिर्‍हाड आंदोलन सुरूच राहिले.
दरम्यान, काल (दि.१७) विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या आंदोलनकर्त्यांचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी संदीप भाबड, कमलाकर पाटील व एस. पी. गावित यांनी दिली.
गेल्या २१ दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्त कार्यालयापासून कायम करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. बिर्‍हाड आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या जाजूबाई भरत पटेल यांचे पती भरत पटेल (३५) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, जाजूबाई पटेलही कोमात असल्याचे संदीप भाबड यांनी सांगितले आहे. या आंदोलकाचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे की उपोषणामुळे झाला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
काल या शिष्टमंडळातील तिघा पदाधिकार्‍यांनी मुंबईवारी करीत अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. त्यामुळेच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, काल रात्री उशिरापर्यंत २२ व्या दिवशी आंदोलन सुरूच होते.(प्रतिनिधी)

Web Title: Birhad movement reached the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.