पक्ष्यांचा संवाद तुटतोय!...1
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30
अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

पक्ष्यांचा संवाद तुटतोय!...1
अ गणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे. गाड्यांचे हॉर्न, माणसांचा गोंगाट उठलाय जीवावरपूर्वी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला यायचा. त्यात पक्ष्यांच्या पिल्लांचाही आवाज असायचा. पण अलीकडच्या काळात हा आवाज कमी होत चालला आहे. कमी होण्यापेक्षा त्यांचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्याची कारण अनेक असली तरी त्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे ध्वनिप्रदूषण आहे. शहरातील गाड्यांचे हॉर्न, मोठ्याने वाजवले जाणारे स्पीकर, माणसांचा गोंगाट यांमुळे पक्ष्यांच्या पिल्लांचा जीव धोक्यात आला आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे या छोट्या पिल्लांना त्यांच्या पालकांचा आवाज पोहोचत नाही. त्यामुळे पिल्लांना आता खायचं आहे, हे कळत नाही. परिणामी, ते उपाशीच राहतात. तसंच एखाद्या भक्ष्याला बळी पडतात. अन्नासाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिल्लांची काळजी घेण्याची जबाबदारी आता समाजासमोर आली आहे.पक्षी विसरले आईचा आवाजपक्षी आपल्या पिल्लांना जसा आदेश देतात, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करतात. पण पक्ष्यांचा हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे या पक्ष्यांचं आयुष्य धोक्यात आलं आहे, हे पक्ष्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. डलहौसी विद्यापीठाने पक्षी आपल्या पिल्लांचं संरक्षण कसं करतात आणि त्यांना कसं भरवतात याचा शोध घेतला घेतला असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.