दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 06:48 PM2021-01-08T18:48:49+5:302021-01-08T18:50:35+5:30

Bird Flu : मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Bird Flu delhi dead crow found in mayur vihars park | दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटाशी आपण सामना करत असतानाच आता 'बर्ड फ्लू'च्या उद्रेकाने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. याच दरम्यान दिल्लीमध्ये बर्ड फ्लूची (Bird Flu) भीती निर्माण झाली आहे. दिल्लीमधील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

कावळ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झालं असून डॉक्टरांची टीम तातडीनो घटनास्थळी दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर विहारमधील सेंट्रल पार्कमधील मृत कावळ्यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या पार्कचे केअर टेकर टिंकू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पार्कमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्याने कावळ्यांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक कावळ्यांची अवस्था बिकट आहे."

डॉक्टरांच्या टीमने घटनास्थळाची केली पाहणी

टिंकू चौधरी यांनी व्हायरल होत असलेला कावळ्यांचा व्हिडीओ आपणच तयार केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. पार्कच्या कर्मचाऱ्यांनी दोन डॉक्टरांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली. आता या मृत कावळ्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजेल अशी माहिती दिली आहे. तसेच देशातील काही राज्यात बर्ड फ्लू आढळल्याने दिल्लीतील कावळ्यांचा मृत्यू झाला हा चिंतेचा विषय आहे. या कावळ्यांच्या मृत्यू थंडी किंवा बर्ड फ्लू ही दोन कारणं असू शकतात असं एका डॉक्टरने म्हटलं आहे. 

बर्ड फ्लूच्या पक्ष्यांचा मृत्यू पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणांच्या जवळ जास्त होतो. त्यामुळे प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच याचं नेमकं कारण समजणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नसताना आणखी एक मोठी समस्या समोर आली आहे. ती आहे बर्ड  फ्लू. हा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक आहे. भारत सरकारनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश, केरळमध्ये बर्ड फ्लू आला आहे. अशात केंद्र सरकारकडून एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. ज्याव्दारे देशात येत असलेल्या या केसेसवर लक्ष ठेवलं जाईल.

बर्ड फ्लूची लक्षणं...

>> खोकला

>> ताप

>> घशात खवखवणे

>> स्नानूंमध्ये ताण

>> डोकेदुखी

>> श्वसनास त्रास होणे
 

Web Title: Bird Flu delhi dead crow found in mayur vihars park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.