शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘बिपोरजॉय’ धडकले; गुजरातेत हाहाकार, एक लाख नागरिकांना हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 06:06 IST

त्यावेळी ताशी १८५ किलाेमीटर वेगाने वारा हाेता

अहमदाबाद/नवी दिल्ली: अखेर चक्रीवादळ ‘बिपाेरजॉय’ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले. ‘लँडफॉल’च्या सुरुवातीच्या प्रक्रियेनंतर त्याने वेग घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले. चक्रीवादळाचा वेग सुरुवातीला ११४-१२५ किमी प्रतितास होता आणि तो पुढे वाढत जाऊन १४०पेक्षा जास्त होईल. आठ किनारी जिल्ह्यांमधून सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

‘बिपाेरजाॅय’ राजस्थानच्या दिशेने जाणार असल्याने राजस्थान प्रशासनानेही तयारी केली आहे. बिपाेरजाॅय हे जमिनीवर धडकण्यापूर्वी समुद्रात सर्वाधिक १० दिवस घाेंघावणारे चक्रीवादळ ठरले आहे. यापूर्वी १९७५ मध्ये आलेले चक्रीवादळ ९ दिवस समुद्रात हाेते. त्यावेळी ताशी १८५ किलाेमीटर वेगाने वारा हाेता. तब्बल १० दिवस समुद्रावर घाेंघावल्यानंतर ‘बिपाेरजाॅय’ चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. कच्छ भागातील मांडवी येथे ताशी १२५ ते १४० किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाने तडाखा दिला.

बचाव पथके तैनात

गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात आहेत. याशिवाय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाचे जवान बचावकार्यासाठी सज्ज होते.

लष्करही सज्ज

लष्कराने भूज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे २७ मदत तुकड्या तयार ठेवल्या आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी पाणबुडे आणि चांगले जलतरणपटू तैनात केले आहेत.

पाकमध्ये ६७,००० नागरिकांना हलवले

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात बिपोरजॉयच्या धक्क्यापूर्वी सिंध प्रांतातील सुमारे ६७,००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळGujaratगुजरातPakistanपाकिस्तान