शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक'ला आमंत्रण, पण पाकिस्तानला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 10:41 IST

येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला बिम्सटेक (BIMSTEC ) देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचे समजते. 

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना आमंत्रित केले होते. यंदा बिम्सटेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भुतान आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे. 'प्रथम शेजार' या धोरणानुसार भारताने अन्य देशांना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्या शेजारी राष्ट्रांना आमंत्रण दिले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2014 च्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित केले होते. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, यंदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रण देण्यात आले नाही. भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव मोठ्याप्रमाणात वाढला होता. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. तसेच, या निवडणुकीत नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानBJPभाजपाImran Khanइम्रान खानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९