शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या शपथविधीला बिमस्टेकच्या नेत्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:49 IST

30 मे रोजी संध्याकाळी होणार मोदींचा शपथविधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बिमस्टेकचे नेते उपस्थित राहणार आहेत. 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी होईल. या सोहळ्यासाठी बिमस्टेकचे (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन) नेते उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकार शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध उत्तम राखण्यास प्राधान्य देत असल्यानं बिमस्टेकच्या नेत्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. बिमस्टेकमध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतानचा समावेश होतो. भारतदेखील बिमस्टेकचा सदस्य आहे. 'शेजारी राष्ट्रांसोबत उत्तम संबंध राखण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. त्यासाठीच बिमस्टेकच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. किरगिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सोरोनबे जीनबीकोव यांनादेखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. सोरोनबे सध्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम करत आहेत. याशिवाय मॉरिशनच्या पंतप्रधानांनाही सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याच वर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमालादेखील ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिलं होतं. 26 मे रोजी हा शपथविधी सोहळा संपन्न झाला होता. सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्यानं पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफदेखील मोदींच्या शपथविधीला उपस्थित होते. मात्र यंदा पाकिस्तानच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेलं नाही. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं केलेला एअर स्ट्राइक यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मोदींनी फोन करुन निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा