शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:19 IST

एकीकडे काँग्रेस या विधेयकाचा विरोध करत आहे, तर दुसरीकडे थरुर यांनी समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर असो किंवा देशाची अर्थव्यवस्था असो...अनेकप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कौतुक केल्यामुळे काँग्रेस खासदार शशी थरुर गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. एकीकडे काँग्रेस प्रत्येक मुद्द्यावरुन सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे थरुर पक्षविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारने आणलेल्या नवीन विधेयकाचे कौतुक केले आहे. 

केंद्र सरकार आज (२० ऑगस्ट) लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके सादर केली आहेत, ज्या अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांसंदर्भात सलग ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा इतर कुठल्याही मंत्र्याला पदावरुन काढून टाकण्याची तरतूद आहे. या विधेयकाला शशी थरुर यांनी पाठिंबा दिला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना थरूर म्हणाले, 'ही सामान्य बाब आहे, मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही.'

नवीन विधेयकावर विरोधकांची टीकाकाँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा या विधेयकावर जोरदार टीका करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. या कठोर विधेयकावर टीका करताना प्रियंका म्हणाल्या, उद्या तुम्ही मुख्यमंत्र्यांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करू शकता, त्यांना दोषी ठरवल्याशिवाय ३० दिवसांसाठी अटक करू शकता मुख्यमंत्रिपदावरुन हटवू शकता. हे विधेयक पूर्णपणे असंवैधानिक आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणतात की, केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पराभूत करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना काढून टाकण्यासाठी असा कायदा आणू इच्छित आहे. तर, हे विधेयक राहुल गांधी यांच्या बिहारमधील 'मत हक्क यात्रे'वरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असल्याची टीका खासदार गौरव गोगोई यांनी केली. 

अमित शाहांनी मांडले तीन विधेयक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत तिन्ही विधेयकांचा प्रस्ताव सादर करतील. या विधेयकांमध्ये अशी तरतूद आहे की, जर पंतप्रधानमुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली, तर त्यांना अटकेच्या ३१ व्या दिवशी पदावरुन काढून टाकता येते. केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५, १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५, अशी या विधेयकांची नावे आहेत. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद