बिल गेट्सनी घेतला झणझणीत 'मिसळी'चा आस्वाद

By Admin | Updated: September 19, 2014 11:06 IST2014-09-19T10:48:14+5:302014-09-19T11:06:17+5:30

'मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्सनी नितीन गडकरींच्या घरी 'मिसळी'चा पुरेपूर आस्वाद घेतला.

Bill Gatesney took a puffed-up mix of 'Misli' | बिल गेट्सनी घेतला झणझणीत 'मिसळी'चा आस्वाद

बिल गेट्सनी घेतला झणझणीत 'मिसळी'चा आस्वाद

रघुनाथ पांडे
नवी दिल्ली, दि. १९ -  सध्या भारतात आलेल्या 'मायक्रोसॉफ्ट' या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेट्स  यांनी  अस्सल भारतीय चवीच्या 'दही-मिसळी'चा पुरेपूर आस्वाद घेतला. शुक्रवारी सकाळी बिल गेट्स यांनी  पत्नी व २० सचिवांसह भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरींची त्यांच्या १३,३ मूर्ती लेन या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रंगलेल्या गप्पांसोबत बिल गेट्स यांनी झणझणीत 'दही-मिसळ'ही खाल्ली. विशेष म्हणजे ही मिसळ खुद्द गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी बनवली होती. पोटभर मिसळ खाऊन तृप्त झालेल्या गेट्स यांना गडकरींतर्फे खास 'बांबू' पासून बनवलेली ब्रीफकेस तर गेट्स यांच्या पत्नीला एक सुंदर साडी भेट देण्यात आली
बराच काळ रंगलेल्या गप्पानंतर गेट्स यांनी गडकरींचा निरोप घेतला व ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले. 

 

Web Title: Bill Gatesney took a puffed-up mix of 'Misli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.