शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा थुंकण्यासाठी चालकाने धावत्या गाडीचा दरवाजा उघडला; व्यापाऱ्याचा मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:27 IST

छत्तीगडमध्ये एका भीषण अपघातात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Accident:छत्तीसगडमधील बिलासपूर येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.  इनोव्हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. इनोव्हा चालकाने १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असताना गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला, ज्यामुळे गाडी उलटली आणि हा अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये प्रचंड वेगात असलेली गाडी उलटत असताना दिसत आहे.

मृत व्यक्तीचे नाव जॅकी गेही असे आहे, जो कापड व्यवसायिक आहे. गुटखा थुंकण्यासाठी जॅकीच्या चालकाने कारचा दरवाजा उघडला होता. त्यामुळे इनोव्हा कार अनियंत्रित झाली आणि मोठा अपघात झाला. ही घटना रात्री उशिरा २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान चाकरभट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील बिलासपूर-रायपूर रोडवरील गुरु नानक ढाब्यालगत घडली. इनोव्हा रस्त्यावरून उलटली आणि इतर दोन वाहनांना धडकली, ज्यामुळे दुसराही चालक जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रभठ्ठा येथील रहिवासी पंकज छाब्रा, जॅकी गेही आणि आकाश चांदनी हे बिलासपूर इथे आले होते. रात्री उशिरा पार्टी केल्यानंतर तिघेही इनोव्हा कारने घरी परतत होते. वाटेत त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की इनोव्हा रस्त्यावर गोलगोल फिरत राहिली. फिरणाऱ्या कारचा वेग इतका जास्त होता की कारचे दरवाजे उघडले आणि तिन्ही तरुण वेगवेगळ्या दिशेने रस्त्यावर पडले.

जॅकी डिव्हायडरजवळील लोखंडी अँगलला धडकला. त्याच्या डोक्याला, छातीला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा आकाश चांदनी आणि मागे बसलेला पंकज छाब्रा यांनाही गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी, अनियंत्रित इनोव्हा अपघातानंतरही थांबली नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. त्यानंतर इनोव्हा ढाब्याबाहेर उभ्या असलेल्या एर्टिगा कारला धडकली. या धडकेत एर्टिगाच्या आत बसलेला चालकही जखमी झाला आणि त्याच्या कारचा चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना तातडीने सिम्स रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी जॅकी गेही यांना मृत घोषित केले, तर जखमींवर उपचार सुरू केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने हटवली आणि वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघातPoliceपोलिस