शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:58 IST

नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील.

पटना - बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निकालानंतर २ प्रश्न प्रामुख्याने राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एक म्हणजे पुढील मुख्यमंत्री कोण असणार आणि दुसरे नवीन सरकारचा फॉर्म्युला कसा असणार? बिहारमध्ये यावेळी मुख्यमंत्री कुणीही बनेल परंतु कॅबिनेटचा फॉर्म्युला पूर्णपणे बदलावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच ५ पक्षाचे प्रतिनिधित्व असेल. त्याशिवाय भाजपाच्या कोट्यातील मंत्र्‍यांचीही संख्या कमी असू शकते. 

यंदा ६ आमदारावर १ मंत्रिपद

२०२० साली एनडीएला १२६ जागांवर विजय मिळाला होता. ज्यानंतर ३.५ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. बिहारमध्ये जास्तीत जास्त ३६ मंत्रिपदे आहेत. यावेळी एनडीएच्या वाट्याला १९८ जागा आल्या आहेत. या हिशोबाने प्रत्येक ६ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. मागील सरकारमध्ये जेडीयू १३, भाजपाकडे २२ मंत्रिपदे होती. यावेळी नवा फॉर्म्युला बनवला तर जेडीयू १५ आणि भाजपा १६, लोजपा ३ मंत्री बनवू शकतात. त्याशिवाय उपेंद्र कुशवाह आणि हम यांनाही एक मंत्रिपद मिळेल.

खातेवाटपातही यावेळी बदल झाल्याचे दिसून येईल. मागील वेळी भाजपाकडे जास्त खाती होती. भाजपाने २६ खाती घेतली होती. त्यात आता घट होईल. लोजपाला भाजपाच्या कोट्यातून एक मोठे खाते जाऊ शकते. मागील कॅबिनेटवेळी भाजपाकडे अर्थ आणि नियोजन, बांधकाम, महसूल, नगरविकास, उद्योग, आरोग्य, कृषी, विधी विभाग अशी खाती होती. जेडीयूकडे मागील कॅबिनेटमध्ये गृह, इंटेलिजेंस, जल संधारण, ग्रामविकास, शिक्षण यासारखी प्रमुख खाती होती. यावेळी यात खातेबदल होऊ शकतो. 

दरम्यान, नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. त्याचप्रकारे अन्य काही मंत्र्‍यांना डच्चू दिला जाऊ शकतो. भाजपाकडे ६ आमदारांच्या फॉर्म्युल्यावर १६ मंत्रिपदे येऊ शकतात त्यामुळे आधीच्या ५ मंत्र्‍यांना हटवावे लागेल. जेडीयूही काही मंत्रि‍पदात बदल करू शकतात. जेडीयू प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा निवडणूक जिंकलेत. त्यांनाही कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकते. 

किती उपमुख्यमंत्री असणार?

नितीश कुमार जेव्हा जेव्हा मजबूत स्थितीत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री ठेवतात. २०२० मध्ये जेव्हा नितीश कुमार कमकुवत होते तेव्हा भाजपाने २ उपमुख्यमंत्री बनवले होते. यावेळी भाजपा आणि नितीश कुमार दोघेही मजबूत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री असतील हा प्रश्न आहे. त्याशिवाय १९ जागा जिंकणाऱ्या लोजपाही उपमुख्यमंत्रिपदावर दावा करणार का हेदेखील काही दिवसांत कळेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar BJP's victory brings headaches; cabinet formula needs change?

Web Summary : Despite winning most seats in Bihar, BJP faces challenges. A new cabinet formula is needed with five parties represented. JDU and BJP may have fewer ministers. Deputy CM question lingers amid power dynamics.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार