बिहार- माओवाद्यांनी रुळ उडवल्याने रेल्वे विस्कळीत

By Admin | Updated: July 23, 2014 11:05 IST2014-07-23T10:18:49+5:302014-07-23T11:05:13+5:30

बिहारमधील गया येथे नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने रेल्वे रुळ उडवल्यामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Bihar: Railway disrupted due to Maoists' outburst | बिहार- माओवाद्यांनी रुळ उडवल्याने रेल्वे विस्कळीत

बिहार- माओवाद्यांनी रुळ उडवल्याने रेल्वे विस्कळीत

ऑनलाइन टीम

पाटणा, दि. २३ - बिहारमधील गया येथे नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने रेल्वे रुळ उडवल्यामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. दिल्ली ते भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस उडविण्याची माओवाद्यांची योजना होती, अशी माहिती मिळत आहे. 
गया जिल्ह्यातील इस्माइलपूर व रफिगंज स्थानकादरम्यानचा रेल्वे रुळ माओवाद्यांनी स्फोटकांच्या साहाय्याने उडवला. स्फोटामुळे येथून जाणारे राजधानी एक्स्प्रेसचे पायलट इंजिन रुळावरून घसरले. त्यानंतर रेल्वेच्या अधिका-यांनी सतर्कतेने त्या मार्गावरून जाणारी राजधानी एक्स्प्रेस रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.  
दरम्यान रेल्वेमंत्र्यांनी याबबात अहवाल मागवला आहे. 

Web Title: Bihar: Railway disrupted due to Maoists' outburst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.