शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा भीषण अपघात, २१ डब्बे घसरले, ६ मृत्यू १०० जखमी; रेल्वेमंत्री मध्यरात्रीच घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:36 IST

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले.

Bihar Railway Derail: आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या (१२५०६) नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरजवळ रुळावरून घसरले. या अपघातात अनेक ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी अपडेट माहितीही शेअर केली आहे.  

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. या अपघाताचे वृत्त कळताच वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही तात्काळ यंत्रणा कामाला लावली. तसेच, स्वत:ही घटनास्थळाचा दौरा केला. या अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने पुढे पाठविण्यात आले आहे. तर, पुढील काही वेळातच हा रेल्वेमार्ग सुरळीत होईल, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाप्रती रेल्वेमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, घटनेची सखोल तपासणी करण्यात येईल, असेही म्हटले.  दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विटरवरुन रेल्वे दुर्घटनेची माहिती देताना मदत व बचावकार्य वेगात सुरू असल्याचे सांगितले. तसेच, SDRF पथक घटनास्थळी पोहोचले असून वेगाने मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी, त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओही रात्रीच शेअर केले आहेत.  

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २१ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातministerमंत्रीBiharबिहारAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव