शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकांसह 18 जणांकडून 7 महिन्यांपासून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 09:02 IST

18 आरोपींपैकी 4 जण अटकेत; 14 जणांचा शोध सुरू

पाटणा : बिहारमधील सारण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि पंधरा विद्यार्थ्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता, अशी तक्रार विद्यार्थिनीनं पोलिसांकडे दिली आहे. यानंतर सारण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यापासून आपल्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडत होता, अशी माहिती पीडित विद्यार्थिनीनं पोलिसांना दिली. पीडितेचे वडील गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यामुळे तिने इतके दिवस या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये 18 जणांच्या नावांचा समावेश आहे. 'डिसेंबरमध्ये काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्वच्छतागृहात माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओदेखील तयार केला. तेव्हापासून ते विद्यार्थी मला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करायचे. त्यानंतर अनेकदा त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला,' अशी माहिती पीडितेनं दिली. या घटनेची तक्रार करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे गेल्याचंही पीडितेनं सांगितलं. 'माझ्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मी मुख्याध्यापकांना सांगितला. मात्र त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी दोन शिक्षकांसह माझ्यावर बलात्कार केला,' अशी व्यथा पीडितेनं मांडली. पीडित मुलीनं तक्रारीत 18 जणांची नावं सांगितल्याची माहिती सारणचे एसपी हरकिशोर राय यांनी दिली. 'या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली असून 14 जणांचा शोध सुरू आहे,' असं राय यांनी सांगितलं.  

टॅग्स :Rapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कारBiharबिहारSchoolशाळा