शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Politics: जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव! महाआघाडीत सहभागी झालेले हे छोटे पक्ष करतायत मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 17:25 IST

Bihar Politics Tension : ...यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले.

बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेले छोटे पक्ष आता एका समन्वय समितीची मागणी करताना दिसत आहेत. यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. नुकतेच तत्कालीन कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा, त्यांचे वडील तथा आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आणि जेडीयूतील नाराजीनंतर अशा प्रकारची समिती असावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

खरे तर, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नुकतेच, 2023 पर्यंत तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, अशा आशचे  वक्तव्य केले होते. यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले. सत्ताधारी महाआघाढीतील जेडीयू आणि आरजेडी या दोन सर्वात मोठ्या घटक पक्षांत तणाव निर्माण झाल्याने सरकारमध्ये सहभागी असलेल्या छोट्या पक्षांनी सरकारचे कामकाज सुरळितपणे चालावे यासाठी एक समन्वय समिती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दोन महिन्यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडले आहेत नितीश -मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडले आणि बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव पुढील वर्षापर्यंत मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केल्यानंतर, सात पक्षांच्या या महाआघाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारPoliticsराजकारण