शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी शपथविधी सोहळा; नितीश कुमारांसोबत 8 जण घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 14:17 IST

नितीश कुमार आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

पाटणा: बिहारच्याराजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सायंकाळी भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. एकूण 128 आमदारांचे समर्थन पत्र त्यांनी सादर केले आहे. आज सायंकाळी एकूण 9 जण मंत्रिपदाची  शपथ घेणार आहेत. या मंत्र्यांची संभाव्य नावे समोर आली आहेत.

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. जेडीयू महाआघाडीपासून फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहे. या सरकारमध्ये जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही समावेश असेल. नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवनात 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार असल्याची माहिती दिली. बिहारच्या नव्या एनडीए सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री असू शकतात, तर डॉ. प्रेम कुमार यांनाही मंत्रिपद मिळेल. याशिवाय, जेडीयूकडून विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमार, एचएएमकडून जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस