शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 11:42 IST

सोनिया गांधी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा लालू प्रसाद यादव यांना दिला सल्ला.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी बिहारच्या पहिल्या माजी महिला मुख्यमंत्री (Former Bihar CM) राबडी देवी (Rabri Devi) यांच्या अपमानाबद्दल खेद व्यक्त केला. महाराष्ट्रातील भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रभारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना 'मराठी राबडी देवी' असे संबोधले. परंतु त्याचा 'अपमान' किंवा 'अपशब्द' मानून त्या ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई केली, तर आरजेडीला काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारकडे आपला विरोध दर्शवायला हवा, असं त्यांनी निवेदन जारी करत म्हटलं. 

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव हा काही असंसदीय शब्द आहे का? असा सवालही सुशीलकुमार मोदी यांनी केला. महाराष्ट्र पोलीस राबडी देवी यांना सन्मानित महिला मानत नाहीत का, ज्यांची तुलना मराठीशी करता येईल? हे भाजपला जाणून घ्यायचं आहे. सुशांतसिंह राजपुतच्या प्रकरणावर पांघरूण घालणाऱ्या आणि महिन्याला १०० कोटी रुपयांच्या अवैध वसूलीचे डाग लागलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडून राबडी देवी यांचा अपमान केला जात असल्याचंही ते म्हणाले. 

सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोलावं राबडी देवी यांच्याशी भाजपचे राजकीय मतभेद असू शकतात आणि त्यांनी बिहारच्या राज्यपालांबद्दल काही शब्दांचा वापर केला असला तरी आमचा पक्ष नेहमीच राबडी देवी यांचा आदर करतो. तुमच्यात हिम्मत असेल तर लालूप्रसाद यादव यांनी सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर बोलावे. आरजेडी विनाकारण भाजपला लक्ष्य करत आहे, असंही ते म्हणाले. 

लालू प्रसाद याव हे चारा घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्यानंतर राबडी देनी या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. लालू प्रसाद यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून टीकाही झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्यांची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्यांला सोडण्यात आलं. गजारिया यांनी ट्वीटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र