शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:49 IST

'जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 20 जागाही मिळणार नाहीत. असे झाले, तर मी निवृत्ती घेईन.'

Bihar Politics (Marathi News) :बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी INDIA आघाडीपासून फारकत घेत NDA सोबत सरकार स्थापन केले आहे. काल(दि.28) नितीश कुमारांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सरकारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, यामुळे विरोधक त्यांना संधीसाधू, पलटूराम अन् आयाराम-गयाराम म्हणत आहेत. या सगळ्यात जनसूरज अभियानाचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातमी- 'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

नितीश कुमारांची आयुष्यातील शेवटची इनिंग...एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल करत भाजपला विध्वंसक पक्ष म्हटले. 'भाजपने इंडिया आघाडी नष्ट करण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. बिहारमध्ये भाजप एकट्याने लढला असता तर जास्त फायदा झाला असता. नितीश कुमार कधी काय करतील, हे कोणालाच माहीत नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे, त्यामुळे ते आपली खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. नितीश त्यांच्या आयुष्यातील शेवटची इनिंग खेळत आहेत,' अशी टीका पीकेंनी केली. 

संबंधित बातमी- 'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

एनडीए क्लीन स्वीप मारेल'नितीश कुमारच नाही तर बिहारमधील सर्वच पक्ष 'पलटूराम' आहेत. 2025 च्या निवडणुकीत ही युती टिकू शकणार नाही. या युतीमुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. भाजप एकटा लढला असता तर जिंकण्याच्या स्थितीत राहिला असता.' 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकीत करताना प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप/एनडीए निवडणुकीत क्लीन स्वीप मारेल आणि नरेंद्र मोदी, हा त्यांचा एकच मुद्दा असेल. सध्या त्यांच्या आजूबाजूला कोणीही दिसत नाही.'  

संबंधित बातमी- 'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

...तर निवृत्ती घेईल'नितीश कुमार धूर्त आहेत, त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केली. पण, बिहारचे लोक व्याजासह त्याची परतफेड करतील. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने साथ सोडली किंवा त्यांच्या नेत्याचा चेहरा समोर ठेवला, तर जनता जेडीयूला नाकारेल. नितीश कुमार कोणासोबतही लढले, तरीदेखील पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 20 जागाही मिळणार नाहीत. असे झाले, तर मी निवृत्ती घेईन,' असंही पीके यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी