शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार आजच राजीनामा देण्याची शक्यता; लालुंचे मिशन १६ सुरु, काँग्रेसचे १० आमदार फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 13:13 IST

Bihar Political Crisis Update News: नितीशकुमारांनी आज आणि उद्याचे सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी १२२ चा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे.

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जदयू अध्यक्ष नितीश कुमार आज दुपारीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना भाजपासोबत सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी लालुप्रसाद यादवांनी मिशन १६ सुरु केले असून ते हाणून पाडण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे १० आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. संख्याबळ पाहता नितीशकुमारांना सत्तेसाठी रस्सीखेच करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचले! आज रात्रीच भाजपा नितीशकुमारांना समर्थन देणार; दोन उपमुख्यमंत्री

नितीशकुमारांनी आज आणि उद्याचे सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी १२२ चा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे. हा आकडा पार करण्यासाठी भाजपा काँग्रेसच्या १० आमदारांच्या संपर्कात आहे. हे १० आमदार नितीशकुमार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

कोणाचे संख्याबळ किती? बिहार विधानसभेत भाजपाकडे ७८ जागा आहेत. जदयूकडे ४५ आमदार आहेत. तर एनडीएचा सहकारी पक्ष हमकडे ४ आमदार आहेत. हे संख्याबळ १२७ होते. लालूंनी जेडीयूचे नाराज आमदार फोडण्यास सुरुवात केली आहे. ही संख्या १६ असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जर सत्ता स्थापन करताना अडचण आली तर काँग्रेसचे १९ पैकी १० आमदार नितीश कुमारांना साथ देऊ शकतात अशी तयारी भाजपाने केली आहे. 

पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना किंवा त्यांच्या नेत्यांना बडी मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. नितीश आणि कुशवाह एकत्र राहिल्यास लोकसभा आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा भाजपाचा अंदाज आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाBiharबिहार