शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Accident: पोलीस जिप्सीवर ट्रक उलटला, भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 12:27 IST

Accident: स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या अपघातात जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथे दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. आज(मंगळवार) पहाटे 5 वाजता झालेल्या अपघातात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर इतर 2 पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या वाहनावर एक भरधाव ट्रक उलटल्याने हा अपघात झाला आहे.

पोलिसांचा होरपळून मृत्यूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरदाणीबाग पोलिसांचे गस्तीचे वाहन (जिप्सी) बेऊर मोरजवळ रस्त्याच्या कडेला उभे होते. यादरम्यान भरधाव वेगाने येणारा वाळुचा ट्रक अचानक जिप्सीवर उलटला. हा ट्रक उलटताच पोलिसांच्या वाहनाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यादरम्यान जिप्सीमध्ये 5 पोलिस कर्मचारी बसले होते. लोक आणि पोलीस मदतीसाठी पोहोचले तोपर्यंत 3 जवानांचा मृत्यू झाला होता. दोन जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चालक ट्रक सोडून पळून गेला

ट्रेनी डीएसपी प्रांजल त्रिपाठी यांनी सांगितले की, ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. रस्त्यावरील दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचा चालक गाडी सोडून पळून गेला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुळी तपास करत आहेत. आजूबाजूच्या लोकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

धुक्यामुळे अपघातमृत्युमुखी पडलेले तिघेही होमगार्ड जवान होते. प्रभू साह, पुखराज कुमार (दोघेही होमगार्ड कर्मचारी) आणि राजेश कुमार (चालक, जिल्हा पोलिस दल) अशी मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जखमी पोलिसांमध्ये एएसआय सियाचरण पासवान आणि होमगार्ड श्रीकांत सिंग यांचा समावेश आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अपघात घडला तेव्हा रस्त्यावर दाट धुके होते. या धुक्यामुळे समोरुन येणारी वाहने स्पष्ट दिसत नव्हते. या धुक्यामळेच हा अपघात झाला.

500 मीटर पर्यंत स्फोटाचा आवाज घुमला

स्थानिकांनी सांगिल्यानुसार, स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातात पोलिस जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेनंतर गरदाणीबाग आणि बेऊर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकानेही तेथे पोहोचून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. 

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारPoliceपोलिसDeathमृत्यूBlastस्फोट