शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 12:40 IST

कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.

बिहारच्या गोपालगंजमध्ये प्रेम विवाह करणाऱ्या एका कपलने हनीमूनच्या रात्रीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीनंतर मधुचंद्राच्या रात्रीच या जोडप्याने विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर स्थितीत नवदाम्पत्याला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथून त्यांना गोरखपूरला रेफर करण्यात आलं. या घटनेमुळे दोघांचेही कुटुंबीय धक्क्यात आहेत.

कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.  

लग्नानंतर रविवारी घरी जेवणाचा कार्यक्रमही होता. जेवणाच्या कार्यक्रमानंतर पती-पत्नी दोघेही झोपण्यासाठी निघून गेले. मात्र, त्यांनी त्यावेळीच विष खाल्लं. सदर हॉस्पिटलमध्ये प्रेमी जोडप्याला घेऊन आलेल्या कुटुंबीयांनी सांगितलं की, दोघांनी चिकनमध्ये विष मिक्स करून खाल्लं होतं. (हे पण वाचा : बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं)

दोघांनीही विष का खाल्लं याचं कारण कुणालाच माहीत नाही. असं सांगितलं जात आहे की, रूममध्ये दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. ज्यानंतर त्यांना कसंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. रात्री दोघांवरही इमरजन्सी वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय चांगल्या उपचारासाठी दोघांनाही घेऊन फरार झाले.

डॉक्टरांनुसार, कपलने विष खाल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उलटी यावी म्हणून सर्फचं पाणी पाजलं होतं. त्यानंतरही त्यांची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. याप्रकरणी पोलीस अधिकारी बीएन राय म्हणाले की, प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोघेही बेशुद्ध असल्याने चौकशी करता आली नाही. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न