शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Bihar Politics: राज्यात दारूबंदी, अन् विधानसभेत सापडल्या बाटल्या; तेजस्वी यादव संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:13 IST

Bihar Liquor Ban Politics: दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना ऐन अधिवेशनात आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. 

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी (Liquor Ban) केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. 

माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. 

विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे., असे ट्विट त्यांनी केले आहे. 

बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही विधानसभेत दारू आणली जाते, त्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. मग बिहारमध्ये काय सुरु असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तेजस्वी म्हणाले आहेत. हा एक गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिहारभर उघडउघड दारू विकली जात आहे. विधानसभेत सापडत आहे, असा मुद्दा तेजस्वी यांनी विधानसभेत उपस्थित केला, यावर अध्यक्षांनी उद्यापासून सुरक्षा वाढविली जाईल असे सांगितले. 

दारूबंदीवर दोन आमदार भिडले, शिवीगाळहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राजद आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपा आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. एवढी की दोघेही सभागृहात आहे हे विसरले आणि एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार