शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:24 IST

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

पाटणा: बिहारच्या छपरा जिल्ह्यात बनावट/विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, आतापर्यंत 47 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजब विधान करून सर्वांनाच चकीत केले आहे. गुरुवारी विधानसभेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ''जो दारू पितो तो नक्कीच मरतो. बिहारमध्ये बनावट दारूमुळे मृत्यू होणे ही नवीन गोष्ट नाही. देशभरातील लोक बनावट दारूमुळे मरतात. विरोधक केवळ दारूच्या मुद्यावर राजकारण करत आहेत. बिहारमध्ये दारूबंदी नसतानाही इतर राज्यात लोक मरायचे. लोकांनी स्वतः सावध राहावे. दारू वाईट आहे आणि त्याचे सेवन करू नये.''

दारूबंदीचा अनेकांना फायदा झालासीएम नितीश कुमार पुढे म्हणाले की, ''दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारू सोडली, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. मी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहे की, दोषींना पकडावे, गरिबांना पकडू नये. दारू बनवणाऱ्या आणि दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करावी.''

दारू सोडणाऱ्यांना एक लाख रुपये देणार मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''गेल्या वेळी जेव्हा बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाला होता तेव्हा कोणीतरी त्यांना नुकसान भरपाई द्या, असे म्हटले होते. भरपाई कशासाठी? जर एखादा दारू प्यायला, तर तो मरेलच. उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यावर शोक व्यक्त करायला हवा, त्या ठिकाणांना भेटी देऊन लोकांना समजावून सांगायला हवे. आमचे सरकार लोकांना दुसरे काम सुरू करण्यासाठी एक लाख रुपये देण्यास तयार'' असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता जागृत होत नाहीदारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ''हे बिहारचे दुर्दैव आहे. बिहारमध्ये दारू धोरण लागू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण मुख्यमंत्र्यांची सहानुभूती जागृत होत नाही आणि कुणी सभागृहात आवाज उठवला की, कुणालाही अपेक्षित नव्हते, अशी वागणूक दिली जाते.'' यासोबतच माजी राज्यसभा खासदार आरसीपी सिंह म्हणाले की, ''नितीश कुमार देशाचे पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर बिहारचा बळी देत ​​आहेत. 2020 नंतर नितीश कुमार केवळ विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.''

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारliquor banदारूबंदीBiharबिहार