"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:36 IST2024-11-25T15:34:54+5:302024-11-25T15:36:51+5:30
Prashant Kishor News: बिहारमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.

"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
नुकत्याच झालेल्या बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. तर नव्यानेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा दारुण पराभव झाला होता. दरम्यान, या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेमध्ये बिहारी समुदायाशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सद्यस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, बिहार हे एक असं राज्य आहे जे अनेक बाजूंनी अडचणीत सापडलेलं आहे. जर बिहार हा एक देश असता तर तो जगातील ११ वा सर्वात मोठा देश असला असता. आम्ही लोकसंख्येच्याबाबतीत जपानला मागे टाकलं आहे. येथील समाज हा सुधारणांबाबत नाउमेद झाला आहे, हेच सर्वात मोठं आव्हान आहे.
या परिसंवादामध्ये प्रशांक किशोर यांनी बिहारमधील पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी आपला पक्ष हा २०२५ वर्षे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठी नुकत्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यातील सत्ताधारी एनडीए आघाडीने दणदणीत यश मिळवलं होतं. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.