शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:21 IST

यासंदर्भात माहिती देताना संबंधित पोलीसठाण्याचे प्रमुख विनीत कुमार म्हणाले, ‘वऱ्हाडाला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळताच आपण घटनास्थळी दाखल झालो. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला. कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.

बिहारमधील मोतिहारी येथील पतहा पोलिसठाण्याच्या हद्दीतील एका गावात "जयमाला" समारंभानंतर नवरी मुलीने लग्नास नकार दिला. यामुळे, दोन्ही बाजूंत वाद निर्माण झाला. यानंतर, गावकऱ्यांनी वर आणि त्याच्या कुटुंबाला बंदी बनवले. यासंदर्भात माहिती मिळताच पताही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण मोतिहारीच्या भुराखल गावचे आहे. लग्नाचे वऱ्हाड घोडासहनच्या कदमवा गावातून आले होते. मात्र, वर अशिक्षित असल्याने, संबंधित नवरी मुलीने लग्नास नकार दिला.

संबंधित नवरदेवाचे नाव लवकुश कुमार असे होते. तो अत्यंत आनंदात लग्नासाठी पोहोचला होता. यावेळी वऱ्हाडींनी जोरदार डान्स केला. वऱ्हाड आल्यानंतर मुलीकडच्यांनी नवरदेवाचे पूजन केले. यानंतर "जयमाला" कार्यक्रमानंतर, वऱ्हाडींनी नाश्ता केला. दरम्यान वधू पक्षाकडून एका मुलाने नवरदेवाच्या प्लेटमध्ये नोटा टाकल्या आणि नवरेवाला मोजण्यास सांगितले. मात्र, त्याला ते मोजता आले नाही. यानंतर मुलीने ताबडतोब त्याच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. परिणामी वऱ्हाड नवरी शिवाय रिकाम्या हातानेच आले तसे परतले. 

मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर वर पक्षाच्या मंडळींनी त्यांच्यावर जबरदस्तीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर, वर बदलल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बंदी बनवले. गावात पंचायत झाली. मुलीलाही वारंवार समजावण्यात आले. मात्र, ती लग्नास तयार झाली नाही. यासंदर्भात बोलताना, आपली फसवणूक झाली आहे. वर बदलण्यात आला आहे. ज्या वरासोबत लग्न ठरले होते, तो वऱ्हाड घेऊन आला नाही, असे मुलीकडच्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात माहिती देताना संबंधित पोलीसठाण्याचे प्रमुख विनीत कुमार म्हणाले, ‘वऱ्हाडाला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळताच आपण घटनास्थळी दाखल झालो. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला. कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नPoliceपोलिस