शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:58 IST

Bihar Elections 2025, Disha Patani : बिहार निवडणुकीसाठी सर्वच पक्ष विविध प्रकारे मोर्चेबांधणी करत आहेत. तशातच लालू प्रसाद यादवांचे धाकटे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक अजब खेळी केली आहे.

Bihar Elections 2025: बिहारचे माजी मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी ५ लहान पक्षांसोबत युती करून सर्वांना आश्चर्यचकित केले. युतीची घोषणा करताना तेज प्रताप म्हणाले की, आमची युती सामाजिक न्याय, सामाजिक हक्क आणि संपूर्ण परिवर्तनाच्या भावनेने काम करेल. हे सर्व पक्ष असे आहेत की लोक त्यांना इंटरनेटवर पटकन शोधूही शकत नाहीयेत. या ५ पक्षांमध्ये एक पक्ष असा आहे, ज्याचे सोशल मीडियावर केवळ फक्त ३ फॉलोअर्स आहेत. इतकेच नव्हे तर हा पक्ष अभिनेत्री दिशा पटानी (Dish Patani) हिला फॉलो करतोय.

कोणत्या ५ पक्षांशी युती?

तेज प्रताप यादव यांच्यासोबत, विकास वंचित इन्सान पार्टी (VVIP), भोजपुरी जन मोर्चा (BJM), प्रगतीशील जनता पार्टी (PJP), वाजिब अधिकार पार्टी (WAP) आणि संयुक्त किसान विकास पार्टी (SKVP) यांनी एखत्र येऊन युती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी वाजिब अधिकार पार्टीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे. तर प्रगतीशील जनता पार्टी आणि संयुक्त किसान विकास पार्टीला प्रत्येकी एक निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. संयुक्त किसान विकास पार्टीचे प्रमुख सुधीर कुमार यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नालंदा मतदारसंघातून आपले नशीब आजमावले. सुधीर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले.

PJP अध्यक्षांनी लढवली २०२०ची निवडणूक, दिशा पटानीला पक्ष करतो फॉलो

प्रगतीशील जनता पक्षाबद्दल बोलायचे झाल्यास, हा पक्ष राजकारणाच्या दृष्टीने १० वर्षे जुना पक्ष आहे. हा पक्ष गरीब आणि बेरोजगार तरुणांच्या हिताबद्दल आपल्या भूमिका रोखठोकपणे मांडताना दिसतो. पक्षाचे प्रमुख मनोरंजन कुमार श्रीवास्तव यांनी २०२०च्या निवडणुकीत उशी या निवडणूक चिन्हावर आपले नशीब आजमावले होते. परंतु त्यांना फक्त २८२ मते मिळाली. प्रगतीशील जनता पक्षाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहेत, पण ते तेथे फारसे सक्रिय नाही आणि त्यांचे जास्त फॉलोअर्स नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, त्यांचे @pjp4india हँडल फक्त ३ लोक फॉलो करतात, तर त्यांचा पक्ष स्वतः केवळ ५ लोकांना फॉलो करतो. या ५ अकाऊंटमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल दिशा पटानीचाही समावेश आहे.

दिशा व्यतिरिक्त, ५ लोकांपैकी एक जण दिमित्री म्हणून आहे, जो मोबाईल गेम बनवतो. तर उर्वरित ३ लोकांचे फॉलोअर्स तर खूपच कमी आहेत. एकट्या दिशा पटानीचे ८२ लाख फॉलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे, या पार्टीचे इंस्टाग्रामवर ४१ फॉलोअर्स आहेत तर ते १५ लोकांना फॉलो करते. या हँडलवरून २८ पोस्ट करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादवDisha Pataniदिशा पाटनीbollywoodबॉलिवूड