बिहारच्या 'हॉट सीट' पैकी एक असलेल्या राघोपूरमध्ये तेजस्वी यादव बऱ्याचदा पिछाडीवर पडत चालले होते. परंतू, अखेरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मोठा उलटफेर झाला असून २२ व्या फेरीअखेर तेजस्वी यांनी ८५२३ तर २३ व्या फेरीअखेर ११४८१ मतांनी आघाडी मिळविली आहे.
या आघाडीमुळे आता तेजस्वी यादवांचा विजय निश्चित मानला जात आहे. सतत पिछाडीवर असलेल्या तेजस्वींनी भाजपच्या सतीश कुमार यांना मागे टाकले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सातत्याने पिछाडीवर ठेवल्यामुळे लालू कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतमोजणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात तेजस्वी यादव यांनी जबरदस्त कामगिरी करत ही पिछाडी भरून काढली आणि भाजपच्या उमेदवारावर मोठी आघाडी घेतली आहे.
अद्याप सात राऊंड बाकी असून यामध्ये तेजस्वी यांना आघाडी कायम ठेवावी लागणार आहे. कारण २०२० च्या निवडणुकीत तेजस्वी यांनी सतीश कुमार यादव यांचाही पराभव केला होता, परंतु २०१० मध्ये सतीश यांनी याच जागेवर राबडी देवी यांचा १३,००६ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवली असली तरी यावेळी त्यांना एनडीएच्या वतीने भाजपने उमेदवारी दिली होती.
Web Summary : Tejashwi Yadav surged ahead in Raghopur after trailing, securing a significant lead over BJP's Satish Kumar. Victory seems likely for Yadav.
Web Summary : राघोपुर में पिछड़ने के बाद तेजस्वी यादव ने ज़ोरदार वापसी की और बीजेपी के सतीश कुमार पर बड़ी बढ़त हासिल की। यादव की जीत लगभग तय मानी जा रही है।