बिहार निवडणुकीत एनडीएने भलीमोठी झेप घेतली असून विरोधी महागठबंधन पुरते झोपून गेले आहे. एकटी भाजपा आणि लोजपा जदयूला बाजुला ठेवून सरकार बनवू शकते एवढा मोठा विजय मिळत चालला आहे. अशातच बिहारमधून पहिला निकाल हाती आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पूर्व चंपारण जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी पहिला निकाल केसरिया विधानसभा क्षेत्राचा घोषित झाला आहे. जदयूच्या उमेदवार शालिनी मिश्रा यांनी येथे प्रतिस्पर्धी व्हीआयपी (विकासशील इन्सान पार्टी) पक्षाचे उमेदवार वरुण विजय यांचा सहज पराभव केला आहे. शालिनी मिश्रा यांना निवडणुकीत ७८,१९२ मते मिळाली, तर वरुण विजय यांना ६१,८५२ मते मिळाली. त्यामुळे शालिनी मिश्रा यांनी १६,३४० मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला आणि केसरिया मतदारसंघात जदयूचा झेंडा फडकवला आहे.
आता हळूहळू सर्वच जागांचे निकाल येण्यास सुरुवात होणार आहे. बिहारचे भावी मुख्यमंत्री तेजस्वी यादव पुन्हा पिछाडीवर पडले आहेत.राघोपूर ही राजदचा बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे तेजस्वी यादव यांची पिछाडी राजदच्या कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सतीश कुमार यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत तेजस्वींना आव्हान दिले आहे आणि त्यांच्यावर ३,२३० मतांची आघाडी घेतली आहे.
Web Summary : NDA surges ahead in Bihar elections. JDU's Shalini Mishra wins the Kesaria seat. Tejashwi Yadav trails in Raghopur, a stronghold for RJD, causing concern among party workers as initial results emerge.
Web Summary : बिहार चुनाव में एनडीए आगे। जदयू की शालिनी मिश्रा ने केसरिया सीट जीती। राजद के गढ़ राघोपुर में तेजस्वी यादव पीछे, शुरुआती नतीजों से पार्टी कार्यकर्ताओं में चिंता।