Bihar Election 2025 Satta Bazar News: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. आरोप-प्रत्यारोप करत नेते राजकीय विरोधकांवर तुटून पडू लागले आहेत. पण, या सगळ्यात बिहारमध्ये पुढचे सरकार कोणाचे असेल, याबद्दल वेगवेगळे अडाखे बांधले जात आहे. यात राजस्थानातील प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजारातही वातावरण गरम असून, बिहारमधील सत्तेच्या गणिताचे कौल व्यक्त करण्यात आले आहेत. फलोदी बाजारात एनडीए आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे.
सट्टा बाजाराचा कल आहे की, बिहारमध्ये पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येण्याची शक्यता जास्त आहे. जर एनडीएवर १००० रुपये लावले असतील, तर तुम्हाला २००० मिळू शकतात.
बिहार विधानसभा निवडणूक : कोणाला किती जागा मिळणार?
एनडीएला १२८ ते १३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला ९७ ते १०० जागा मिळेल, असा कल आहे.
फलोदी सट्टा बाजारात नितीश कुमार मुख्यमंत्री बनण्याचा रेट ४०-४५ पैसे आहे. नितीश कुमार यांचे स्थिर असून, एनडीएमध्ये दुसरा चेहरा सध्या दिसत नाहीये.
सट्टा बाजाराचा अंदाज आहे की, काँग्रेस, राजद प्रणित महाआघाडीला ९७ ते १०० जागा मिळू शकतात. महाआघाडीच्या भावात सध्या तरी वाढ झालेली नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. जसा प्रचार अंतिम टप्प्याकडे जाईल, तसे भाव बदलत जातील, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.
Web Summary : Bihar's election heats up. Falodi Satta Bazar predicts NDA victory with 128-132 seats, while the India alliance lags. Nitish Kumar remains frontrunner for CM.
Web Summary : बिहार चुनाव में सरगर्मी तेज। फलोदी सट्टा बाजार ने एनडीए की जीत का अनुमान लगाया है, जिन्हें 128-132 सीटें मिलने की संभावना है। इंडिया गठबंधन पीछे है। नीतीश कुमार मुख्यमंत्री पद के प्रबल दावेदार हैं।