शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:44 IST

Bihar Election 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.

Bihar Election 2025: लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने स्वबळावर सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी (११ जून) ही माहिती दिली. यामुळे इंडिया आघाडीला आणखी एक धक्का मानला जातोय. 

काँग्रेसवर निशाणा एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सौरभ भारद्वाज म्हणाले, गुजरातमध्ये पाच जागांवर पोटनिवडणुका होणार होत्या, त्यापैकी काँग्रेसने जिंकलेल्या चार जागा होत्या, तर एक जागा आम्ही जिंकलेली होती. जिथे त्यांचा उमेदवार जिंकला होता, तिथे ते निवडणूक लढवतील आणि जिथे आमचा उमेदवार जिंकला होता, तिथे आम्ही निवडणूक लढवू, असे ठरले होते. त्यांच्या चार जागांवर आम्ही निवडणूक लढवली नाही. पण जेव्हा पाचव्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला. मला वाटते की, हा युतीचा धर्म नाही. बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत, पण शेवटी पक्षातील मोठे नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू, अशी प्रतिक्रिया भारद्वाज यांनी व्यक्त केली.

राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....

ते पुढे म्हणाले, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बिहारमधील लोकांचा रोजगार उद्ध्वस्त केला जातोय, त्यांची घरे बुलडोझरने पाडली जात आहेत. असे म्हणता येईल की, बिहारमधील लोकांना बिहारमध्ये परत हाकलून लावले जात आहे. जर भारतीय जनता पक्ष बिहारमधील लोकांना हाकलून लावू शकतो, तर बिहारमधील लोक भारतीय जनता पक्षाला राज्यातून हाकलून लावू शकतात.   

तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले

भारतीय जनता पक्षाचे धोरण खोटे बोलणे आहे. भाजपवाले खोट्या गोष्टी वारंवार सांगतात, ज्यामुळे तुमचा खोट्यावर विश्वास बसतो. ३१ मे रोजी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या होत्या की, एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही. पण, दुसऱ्याच दिवशी मद्रासी कॅम्पमध्ये सुमारे ८०० झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या, हे भाजपचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी