Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:08 IST2025-09-25T16:07:39+5:302025-09-25T16:08:31+5:30
या वेळच्या बिहार निवडणुकीतील सर्वात मोठा पश्न म्हणजे, प्रशांत किशोर (पीके) यांचा पक्ष या निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल? यश मिळवू शकेल का? महत्वाचे म्हणजे, सध्या, तरुणांचा एक मोठा वर्ग 'पीके'कडे आकर्षित आहे, असेही बोलले जाते.

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
पाटणा : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विविध संस्थांकडून निवडणुकीचे सर्वेक्षण केले जात आहे. 'ASA इंडिया' कंपनीचे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी बिहारमध्ये १० दिवस राहून तेथील राजकीय स्थितीचा अगदी जवळून अभ्यास केला. त्यांनी प्रामुख्याने एनडीए, 'इंडिया' आघाडी आणि प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज' पक्षावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी बिहार तकवर यासंदर्भात भाष्य केले.
या वेळच्या बिहार निवडणुकीतील सर्वात मोठा पश्न म्हणजे, प्रशांत किशोर (पीके) यांचा पक्ष या निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल? यश मिळवू शकेल का? महत्वाचे म्हणजे, सध्या, तरुणांचा एक मोठा वर्ग 'पीके'कडे आकर्षित आहे, असेही बोलले जाते.
सर्वेक्षणानुसार, दक्षिण बिहारमध्ये (भोजपूर, मगध, मुंगेर, भागलपूर) प्रशांत किशोर यांच्या पक्षाला १०-१२% लोकांचे समर्थन मिळत आहे, तर उत्तर बिहारमध्ये (पूर्णिया, दरभंगा, कोसी, तिरहूत, सारण) हे समर्थन ८-१०% पर्यंत कमी होते. खरे तर, मतांचे हे प्रमाण पीके यांनना चर्चेत ठेवते, पण कोणत्याही जागेवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३०-३५% मतांपेक्षा फार कमी आहे.
'पीके' यांच्या राजकारणातील एंट्रीमुळे सर्वात मोठा फटका 'महागठबंधन'ला बसण्याची शक्यता आहे. कारण, जे मतदार सध्याच्या सरकारवर नाराज आहेत, ते सहसा 'महागठबंधन'कडे वळले असते. मात्र, 'पीके' यांच्यामुळे ही मते विभागली जातील. यामुळे 'महागठबंधन'चे नुकसान होऊ शकते. एनडीएच्या जातीय समीकरणामुळे (उच्च जाती, दलित, ईबीसी) त्यांचा व्होट बँक सुरक्षित दिसत आहे.
प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात इतर पक्षांमधून त्यांच्या पक्षात किती बंडखोर नेते येतात, यावर अवलंबून असेल. जर कोणत्याही मोठ्या जातीय गटातून (उदा. ईबीसी, ब्राह्मण, राजपूत) एखादा मजबूत बंडखोर उमेदवार त्यांच्या पक्षात सामील झाला, तर एनडीएलाही काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, पण एकूण परिणाम पाहता 'महागठबंधन'लाच अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.