Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:30 IST2025-11-04T15:29:20+5:302025-11-04T15:30:10+5:30
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री राजीव ललन सिंह यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली.

Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री राजीव ललन सिंह यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली. लल्लन सिंह यांनी मोकामा येथे पक्षाचा प्रचार करताना विरोधी पक्षातील नेत्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जिला प्रशासन, पटना द्वारा वीडियो निगरानी टीम के वीडियो फुटेज की जांच की गई। जांचोपरांत इस मामले में श्री ललन सिंह उर्फ श्री राजीव रंजन सिंह के विरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एवं लोक प्रतिनिधित्व अधिनियम की सुसंगत धाराओं के तहत प्राथमिकी दर्ज की गई है।@CEOBihar@ECISVEEPpic.twitter.com/NVtIPpE3O8
— District Administration Patna (@dm_patna) November 4, 2025
पाटणा जिल्हा प्रशासनाच्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, "जिल्हा प्रशासनाने व्हिडिओ पाळत ठेवणाऱ्या पथकाकडून व्हिडिओ फुटेज तपासले. तपासानंतर, लल्लन सिंह यांच्याविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
दरम्यान, अनंत सिंग यांना दुलारचंद यादव हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अनंत सिंग हे मोकामामध्ये एक मजबूत नेते आहेत आणि त्यांचा मतदारसंघात बराच प्रभाव आहे. त्यांच्या अटकेनंतर केंद्रीय मंत्री लल्लन सिंग यांनी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आणि त्यांनी मोकामामध्ये प्रचार केला. यावेळी लल्लन सिंग म्हणाले की, "काळजी करू नका, मी जबाबदारी घेतली आहे. अनंत सिंग येथे नाहीत, कारण ते नितीश कुमार यांच्या कायद्याच्या राजवटीचा आदर करतात. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि लवकरच कट उघड होईल."
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ६ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.