Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 02:27 PM2020-10-07T14:27:03+5:302020-10-07T14:39:53+5:30

Bihar Election 2020 : 'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे.

bihar election 2020 ravindra yadav alias kapil yadav went on buffalo for nomination | Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

Next

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक अपक्ष उमेदवार सायकल अथवा कार नाही तर चक्क 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल करण्यासाठी आलेले पाहायला मिळाले. 

'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. पालीगंज विधानसभा मतदार संघात 'पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिव्ह'चे रविंद्र प्रसाद उर्फ कपिल यादव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हटके अंदाजात आले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही वाजत गाजत आले होते. सोशल मीडियावर उमेदवाराचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

म्हशीवर स्वार होण्याबाबत जेव्हा स्थानिक पत्रकारांनी कपिल यादव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळेच म्हशीवर स्वार होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मी गरिबांची मदत करू इच्छितो, त्यामुळेच निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला" असं म्हटलं आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

"कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील.  यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"

Web Title: bihar election 2020 ravindra yadav alias kapil yadav went on buffalo for nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.