शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा कुर्सी का! खुर्चीवरून आमदार अन् डॉक्टरांमध्ये जुंपली; रुग्णालयात रंगलं मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:15 IST

आमदारांनी डॉक्टरांना करून दिली प्रोटोकॉलची आठवण; तरीही डॉक्टरांनी दिली नाही खुर्ची

वैशाली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र तरीही देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असतानाही काही ठिकाणी मानापमान नाट्य घडत आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यातील वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राजापाकर येथील एका अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आश्चर्यजनक घटना घडली. राजापाकर मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिमा कुमारी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. रुग्णालयाची पाहणी करता करता त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचल्या. तिथे असलेल्या डॉक्टरांना प्रोटोकॉलची आठवण करून देत कुमारी यांनी त्यांची खुर्ची देण्यास सांगितलं. मात्र डॉक्टरांनी आमदार कुमारी यांना खुर्ची देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दुर्दैवी! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही आईच्या पार्थिवाला अग्नी देण्यास मुलाचा नकार, बहिणींचा आक्रोशतुम्ही इथे बसा, असं म्हणत आमदार कुमारी यांनी डॉ. श्याम बाबू सिंह यांना दुसरीकडे बसण्यास सांगितलं. मात्र सिंह यांनी तिथे बसण्यास नकार दिला. कुमारी यांनी सिंह यांना प्रोटोकॉल सांगितला. त्यावर मला असा कोणताही आदेश मिळालेला नाही, अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे माझी खुर्ची देणार नाही, असं सिंह म्हणाले. त्यामुळे केबिनमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण होतं.डॉ. श्याम बाबू सिंह यांचं उत्तर ऐकून कुमारी यांना काहीसा धक्का बसला. डॉक्टर त्यांच्या विधानावर ठाम होते. त्यामुळे केबिनमध्ये भलताच पेच प्रसंग निर्माण राहिला. डॉ. सिंह यांनी शेवटपर्यंत त्यांची खुर्ची सोडली नाही. त्यामुळे केबिनमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्यानं आमदार कुमारी यांना दुसरी खुर्ची आणून दिली. त्यानंतर कुमारी त्या खुर्चीत बसल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार कमजोर झाल्यानं आता रुग्णालयातील डॉक्टरदेखील प्रोटोकॉल पाळत नाही. त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल आदर नाही, अशी टीका कुमारी यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार