शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 12, 2020 12:01 PM

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देमहाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे.काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. महाआघाडीत एकूण 70 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 19 जागाच जिंकता आल्या. आता या सुमार कामगिरीवरून राज्यात काँग्रेसमध्येच विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी तर पक्षाच्या जगा घसरल्याबद्दल गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले आहे. अशाच एका असंतुष्ट गटाने म्हटले आहे, की काँग्रेसमुळेच महाआघाडीतील सहकारी पक्ष राजद आणि डाव्या पक्षांना फटका बसला आहे.

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी त्यांनी 75 जागा जिंकल्या आहेत. तसेच १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे. अर्थात महाआघाडीत काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी आहे. 

बिहार काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीसाठी पक्षाने चुकीच्या माणसांना तिकीट दिले. याच बरोबर AIMIM फॅक्टर आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसला. याच बरोबर काही नेत्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसला अशा १३ जागा मिळाल्या होत्या, जेथे काँग्रेसने आतापर्यंत निवडणूकच लढवलेली नव्हती. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत पक्षाची कामगिरी चांगली राहिली. याशिवाय काँग्रेसने अशा २६ जागांवर निवडणूक लढवली होती, जेथे गेल्या तीन दशकांत महाआघाडीतील कुण्याही पक्षाला विजय मिळवला आलेला नाही.

३७ जागांवर भाजपशी थेट लढत -काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.

पांडे फक्त सहायकाच्या भूमिकेत -काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले  होते असा आरोप त्या पक्षाच्या  काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी  केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी