शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:26 IST

Bihar CM Nitish Kumar: नितीश कुमारांनी माफी मागितली, पण आता आरजेडीने नवा वाद सुरू केला आहे.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसंख्या नियंत्रणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढल्यानंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली. एकीकडे नितीश कुमार प्रकरण 'कंट्रोल' करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांचा पक्ष RJD भाजपला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात 'अनकंट्रोल' झाला आहे.

नितीश कुमार यांच्या बचावासाठी आरजेडीने बुधवारी (08 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी एक पोस्ट केली. यामध्ये आरजेडीने मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. याशिवाय काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी केलेल्या निदर्शनाचीही आठवण करुन दिली आणि पोस्टमध्ये अतिशय टोकाची टीका केली.

राजदच्या पोस्टमुळे नवा वाद आरजेडीने ही पोस्ट टाकून प्रकरण पुन्हा वाढवले ​​आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सभागृहात ज्या प्रकारे महिलांचा अपमान केला आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावला, त्यावरुन हा राजदच्या संगतीचा परिणाम असल्याचे दिसते. आजही राष्ट्रीय जनता दलाने एक्सवर जे काही लिहिले, त्यावरून स्पष्ट होते की आरजेडीच्या नेत्यांच्या नजरेत महिलांना आदर नाही. हे लोक महिलांना चैनीच्या वस्तू मानतात, म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत.

दरम्यान, राजद आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, आमच्या पक्षाने जे पोस्ट केले आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. मोदी सरकारच्या काळात जे झाले, तेच आम्ही लिहिले आहे. तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमारांच्या वक्तव्याचे समर्थन केले. भाजपनेही तेजस्वींच्या वक्तव्याला विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा