शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:32 IST

काही दिवसांपूर्वी परिसरात दरोडा पडला होता, त्यातील आरोपींनी हे बॉम्ब लपून ठेवल्याचा अंदाज आहे.

Bomb Blast in Bihar: बिहारच्या अररियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कॅनॉल गेटजवळ बॉम्बचा स्फोट झाला, या घटनेत शेळ्या चरणारी पाच मुले जखमी झाली. त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांना बॉम्ब सापडला, त्यांनी बॉल समजून उचलला आणि खेळायला सुरुवात केली, त्याचवेळी बॉम्बचा स्फोट होऊन मुले जखमी झाली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून सर्व जखमी मुलांना उपचारासाठी राणीगंज रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अख्तरी प्रवीण या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसह आणखी चार मुले जखमी झाली असून, 12 वर्षीय मोहम्मद अफजल, 16 वर्षीय सोनू कुमार, 7 वर्षीय साजिद नदाफ आणि 10 वर्षीय जुल्फराज, अशी त्यांची नावे आहेत. चौघांवर राणीगंज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर अख्तरी प्रवीणला अधिक उपचारासाठी अररिया येथे पाठवण्यात आले आहे.

दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आलाघटनेची माहिती मिळताच एसडीपीओ रामपुकर सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्ब निकामी पथक आल्यावर दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला. एफएसएल पथक रात्री उशिरापर्यंत तपासात व्यस्त होते. या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितले की, दररोज प्रमाणे आजही 22 आरडी कालव्याच्या गेटजवळ मुले म्हैस-बकरी चरण्यासाठी गेले होते, तिथे खेळताना त्यांना एक पांढऱ्या रंगाचे बंडल सापडले. चेंडू समजून मुले त्याच्याशी खेळू लागली, यावेळी अचानक बॉम्बचा स्फोट झाला.

 

टॅग्स :BiharबिहारBombsस्फोटकेBlastस्फोटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी