Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. असे असले तरी बिहार निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने माजी केंद्रीय मंत्र्यासह अन्य दोन नेत्यांवर कारवाई करत पक्षातून निलंबित केले आहे.
भाजपाने माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. भाजपाने आर. के. सिंह यांना पक्षातून काढून टाकले आहे. पक्षविरोधी कामे आणि कारवायांमुळे भाजपाने हा निर्णय घेतला आहे. आर.के. सिंह यांच्या अलीकडील विधानांना आणि वर्तनाला भाजपाने अनुशासनहीन मानले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आर. के. सिंह यांच्यासह बिहार विधान परिषदेचे सदस्य अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या नेत्या उषा अग्रवाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
तुमची कृती पक्षाविरुद्ध आहेत. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. हे शिस्तीच्या कक्षेत येते. पक्षाने हे गांभीर्याने घेतले आहे. म्हणून निर्देशानुसार तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात येत आहे आणि तुम्हाला पक्षातून का काढून टाकू नये याचे कारण दाखविण्यास सांगितले जात आहे. हे पत्र मिळाल्यापासून एका आठवड्यात तुमची भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश भाजपाने या निलंबित केलेल्या नेत्यांना दिले आहेत.
दरम्यान, आर.के. सिंह यांनी सातत्याने भाजपा नेतृत्वापासून स्वतःला दूर ठेवले. प्रशांत किशोर यांच्या विधानांना उघडपणे पाठिंबा दिला. निवडणूक प्रचारादरम्यान आर. के. सिंह हे पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीत उपस्थित राहिले नाहीत. तसेच पक्षाच्या बैठकांनाही गैरहजर राहिले. ऐन निवडणुकीत आर. के. सिंह यांच्यामुळे भाजपा नेतृत्वात चिंता निर्माण झाली होती. माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही वक्तव्यांमुळे भाजपासाठी अडचणी निर्माण केल्या. त्यांनी नितीश कुमार सरकारवर गंभीर आरोप केले. ज्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे आर. के. सिंह यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.
Web Summary : Following the NDA's victory in Bihar, the BJP suspended former Union Minister R.K. Singh and two others for anti-party activities. They are accused of undermining the party and must respond within a week or face expulsion.
Web Summary : बिहार में एनडीए की जीत के बाद, भाजपा ने पूर्व केंद्रीय मंत्री आर.के. सिंह और दो अन्य को पार्टी विरोधी गतिविधियों के लिए निलंबित कर दिया। उन पर पार्टी को कमजोर करने का आरोप है और उन्हें एक सप्ताह के भीतर जवाब देना होगा अन्यथा निष्कासन का सामना करना पड़ेगा।