बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:06 IST2025-07-22T17:06:13+5:302025-07-22T17:06:42+5:30
Bihar Assembly Monsoon Session: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आता बिहार विधानसभेमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आता बिहार विधानसभेमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. आज बिहार विधानसभेमध्ये चक्क आमदार आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली. बिहार विधानसभेमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झाला. यादरम्यान, विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार विरोध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरले. तेव्हा आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाचा वाद पेटला आहे. तसेच त्याचे पडसाद बिहारच्या विधानसभेमध्येही उमटले आहेत. सभागृहामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सतीश कुमार हे मतदार यादी पुनरीक्षणाला विरोध करत टेबलावर चढले. त्यानंतर मार्शल्सनीं त्यांना खाली उतरवले. एकीकडे हा गोंधळ सुरू असताना सत्ताधाऱ्यांकडून सभागृहामध्ये एकापाठोपाठ एक विधेयके सादर केली जात आहेत.
विरोधी पक्षांकडून होत असलेल्या विरोधामुळे सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेच्या प्रवेशद्वारांवर अडथळा निर्माण झाला होता. तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अन्य पर्यायी मार्गाने सभागृहात यावं लागलं. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागच्या द्वाराने विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू होताच गोंधळामध्येच प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज पुकारलं गेलं. विधानसभा अध्यक्षांनी गोंधळ घातल असलेल्या सभासदांना इशारा दिला. मात्र हे सदस्य ऐकले नाहीत. त्यापैकी काहींची सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शल्ससोबतही धक्काबुक्की झाली.