Akhilesh Yadav vs BJP, Bihar Assembly Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले आणि ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आणि भाजपा-जेडीयू युतीने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. २४३ जागांवर हाती आलेल्या कलांनुसार भाजपा-जेडीयू युतीला १९०पेक्षाही जास्त जागांवर आघाडी मिळाली. तर राजदचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसून आले.
बिहार मधील निवडणुकीच्या कलांमध्ये एनडीए १९० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे, तर महागठबंधन केवळ ४९ जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडवरून, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होताना दिसत आहे. याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक ट्विट करत भाजपा-जेडीयू युतीला टोला लगावला. "बिहारमधील निवडणुकीच्या ट्रेंडवर भाष्य करताना अखिलेश यादव यांनी टोला लगावला. "बिहारमध्ये SIR ने खेळलेला खेळ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश किंवा इतरत्र शक्य होणार नाही; कारण निवडणुकीतील हा कट उघड झाला आहे. आम्ही त्यांना हा खेळ आता खेळू देणार नाही. सीसीटीव्हीप्रमाणे, आमचे 'पीपीटीव्ही' किंवा 'पीडीए प्रहारी' सतर्क राहतील आणि भाजपचे कट उधळून लावतील. भाजप हा पक्ष नाही, तर एक फसवणूक करणारा गट आहे," असे मत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले.
बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल?
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील दुपारी १ वाजताच्या आकडेवारीनुसार, २४३ जागांपैकी भाजपाने ९१ जागांवर तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने ८१ जागांवर आघाडी घेतली. चिराग पासवान यांच्या पक्षाने २१ जागांवर आघाडी घेतली. दुसरीकडे काँग्रेस महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाला केवळ २७ जागांवर तर काँग्रेसला ४ जागांवर आघाडी मिळाली. त्यामुळे महागठबंधनचे पानिपत झाल्याचे चित्र आहे.
Web Summary : After Bihar's election, Akhilesh Yadav accused the BJP of foul play. He alleged a conspiracy, warning against similar tactics in other states. NDA leads with 190 seats.
Web Summary : बिहार चुनाव के बाद अखिलेश यादव ने बीजेपी पर गड़बड़ी का आरोप लगाया। उन्होंने साजिश का आरोप लगाते हुए अन्य राज्यों में भी इसी तरह की रणनीति के खिलाफ चेतावनी दी। एनडीए 190 सीटों के साथ आगे।