शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 09:10 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत घडलेल्या घडामोडींची आता दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसला तर केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत घडलेल्या घडामोडींची आता दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लढवलेल्या ६१ जागांपैकी केवळ ६ जागांवरच विजय मिळवता आला होता. या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे राजीनामा घेऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे गेले होते. मात्र खर्गे यांनी त्यांना हा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे देण्यास सांगितले. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर घडलेल्या घडामोडी ह्या काँग्रेसला संघटनात्मक दृष्टीने अधिकच चिंतेत टाकणाऱ्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आढावा बैठकीला सुरुवात केल्यावर राहुल गांधी यांनी बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांना बिहारमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदारांनाआत बोलावण्यास सांगितले. त्यावर अल्लावरू हळू आवाजात म्हणाले की,’सर आपले सहाच आमदार जिंकले आहेत आणि ते इथेच उपस्थित आहेत’. हा संवाद ऐकून तिथे उपस्थित असलेले इतर नेते अवाक् झाले. बिहारमध्ये महाआघाडीतील घटकपक्ष म्हणून लढत असलेल्या काँग्रेसला केवळ सहा जागांवरच विजय मिळवता आला याची कदाचित राहुल गांधी यांना कल्पना नसावी.

दरम्यान, या बैठकीमध्ये पुढे जे काही घडलं ते अधिकच धक्कादायक होतं. आढावा बैठकीत काँग्रेसची कामगिरी २०१० च्या तुलनेत अधिक चांगली झाल्याचे सांगण्यात आले. २०१०मध्ये पक्षाने केवळ ४ जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी सहा जागा जिंकल्या. म्हणजे पक्षाची कामगिरी आधीच्या तुलनेच समाधानकारक झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र काँग्रेसच्या बैठकीत घडलेल्या या घडामोडी आता चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Only six? Rahul Gandhi questions Bihar loss; leaders cite low wins.

Web Summary : Rahul Gandhi questioned the low number of Congress MLAs elected in Bihar. Leaders pointed out the party only won six seats, sparking internal discussions about the disappointing performance compared to previous elections.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५