Bihar Assembly Election Result : काँग्रेसनं बिघडवलं महाआघाडीचं गणित? ७० पैकी केवळ एवढ्याच जागांवर आघाडीवर

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 15:50 IST2020-11-10T15:49:40+5:302020-11-10T15:50:48+5:30

Bihar Assembly Election Result News : महाआघाडीमधील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे.

Bihar Assembly Election Result: Congress spoils the maths of the Mahagathabandhan? Only 20 out of 70 seats are in the lead | Bihar Assembly Election Result : काँग्रेसनं बिघडवलं महाआघाडीचं गणित? ७० पैकी केवळ एवढ्याच जागांवर आघाडीवर

Bihar Assembly Election Result : काँग्रेसनं बिघडवलं महाआघाडीचं गणित? ७० पैकी केवळ एवढ्याच जागांवर आघाडीवर

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हळुहळू स्पष्ट होत आहे. बॅलेट मशीन जशजशा उघडत आहेत आणि त्यातील मतदारांचा कौल जसजसा समोर ते आहे तसतश महाआघाडीच्या गोटातील चिंता वाढत आहे. दरम्यान, महाआघाडीमधील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे.

बिहार विधान सभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल १४४, काँग्रेस ७० तर डावे पक्ष २९ जागांवर निवडणूक लढवत होते.

आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये १४४ जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला ६५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २९ जागा लढवणाऱ्या डाव्या पक्षांनी १८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर ७० जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए १२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ७३, जेडीयू ४९, हम २ आणि व्हीआयपी ५ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी १०३ जागांवर आघाडीवर आहे.

Web Title: Bihar Assembly Election Result: Congress spoils the maths of the Mahagathabandhan? Only 20 out of 70 seats are in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.