सध्याच्या परिस्थितीत देशाच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर असं दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या नितीश कुमार यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. यावेळी नितीश कुमारभाजपासोबत एनडीएमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडींच आव्हान आहे. दरम्यान, गेल्या काही विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यास राज्यात एक आश्चर्यजनक कल दिसून येतो. इथे नितीश कुमार ज्या आघाडीमध्ये असतात ती आघाडीच विधानसभा निवडणुकीत बाजी मारताना दिसते.
नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल गेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएकडून लढला होता. २०२० साली कोरोनाचा प्रादुर्भाव असताना झालेल्या त्या निवडणुकीत एनडीएला काठावरचं बहुमत मिळालं होतं. लालूंचा राष्ट्रीय जनता दल पक्ष ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपा ७४ जागांसह दुसरा मोठा पक्ष ठरला होता. निती कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला ४३ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एनडीएतील चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात आघाडी उघडल्याने नितीश कुमार यांच्या पक्षाला मोठा फटका बसला होता. मात्र तरीही सत्ता टिकवून ठेवण्यात नितीश बाबू यशस्वी झाले होते.
तर मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध २०१३ साली एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष महाआघाडीकडून लढला होता. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा दारुण पराभव केला होता. महाआघाडीमधील लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला ८० तर संयुक्त जनता दलाला ७१ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता. भाजपाला केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागले होते.
त्याआधी २०१० मध्ये झालेली बिहार विधानसभेची निवडणूक नितीश कुमार आणि भाजपासाठी बंपर यश देणारी ठरली होती. त्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला ११५ तर भाजपाला तब्बल ९१ जागा मिळाल्या होत्या. लालूप्रसाद यादव यांच्या राजदचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. राजदला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागे होते. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसचीही दाणादाण उडाली होती. तसेच काँग्रेसला २४३ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या होत्या.
तर २००५ मध्ये बिहारमध्ये एकाच वर्षांत दोन वेळा विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी फेब्रुवारी २००५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागले होते. कुणालाही सरकार स्थापन करता न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजपा यांच्या आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला ८८ तर भाजपाला ५५ जागा मिळाल्या होत्या.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, भाजपा, संयुक्त जनता दल असे तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच त्यांचाा जनाधारही जवळपास सारखा आहे. तर लोकजनशक्ती पार्टी, काँग्रेस, हम, डावे पक्ष असे इतर लहान पक्ष आहेत. तसेच बिहारमध्ये निवडणुकीत जातीय समिकरणंही निर्णायक ठरतात. तसेच सर्वच पक्ष कुठल्या ना कुठल्या जातींचं प्रतिनिधित्व करतात. तसेच या पक्षांचा मतदार हा ठरलेला असल्याने तो सहसा त्याच पक्षांना मतदान करतो. त्यामुळेच बिहारमधील भाजपा, संयुक्त जनता दल आणि आरजेडी या तीन प्रमुख पक्षांपैकी दोन पक्ष ज्या बाजूला असतात. त्यांची सत्ता येते. गेल्या २० वर्षांत हेच समीकरण साधून नितीश कुमार यांनी कधी भाजपा तर कधी आरजेडी यांच्यासोबत जुळवून घेत आपली सत्ता राखली आहे. मात्र यावेळी प्रशांत किशोर यांचाही एक नवा पक्ष मैदानात उतरल्याने येथील लढाई रंगतदार होणार आहे.
Web Summary : Bihar elections show Nitish Kumar's alliance often wins. He's allied with BJP now, facing Lalu's RJD. Past results reveal his side usually gains power.
Web Summary : बिहार चुनाव में दिखा है कि नीतीश कुमार का गठबंधन अक्सर जीतता है। वे अभी बीजेपी के साथ हैं, लालू के आरजेडी का सामना कर रहे हैं। पिछले नतीजे बताते हैं कि उनका पक्ष आमतौर पर सत्ता हासिल करता है।