शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
4
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
5
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
6
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
7
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
8
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
9
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
10
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
12
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
13
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
14
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
15
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
16
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
17
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
18
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
19
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
20
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 06:59 IST

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. दोन्ही तनातन स्थितीमध्ये आहेत, तरी निवडणुकीच्या निकालातून काही स्पष्ट चित्र दिसायला लागली आहेत. एनडीए आणि महाआघाडीत मतदारांनी कोण जिंकणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांना विजयाच्या खुणा दिसत आहेत. बिहार विधानसभेसाठी ६५.०८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. याआधी ते ६४.६८ टक्के इतके जास्त झाले होते. 

बिहारच्या निवडणूक इतिहासातील हा मतदानाचा सर्वाधिक आकडा आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीतील ६२.६ टक्के आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीतील ६४.६ टक्क्यांचा विक्रम या वेळी मोडला आहे. २०२० च्या निवडणुकीतील ५७.२९ टक्क्यांच्या तुलनेत यंदा तब्बल ७.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एनडीए याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वावर निर्माण झालेला पुनर्विश्वास मानत आहे. विशेषतः महिला मतदारांचा मोठा सहभाग महत्त्वाचा मानत आहे. नितीशकुमार यांच्या कल्याणकारी योजनांमुळे ही टक्केवारी वाढली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर महाआघाडीच्या मते, ही वाढ बदलाच्या लाटेचे द्योतक असून, बेरोजगारीने त्रस्त तरुणवर्गाने मोठ्या संख्येने मतदान केले आहे. या वर्गाला नोकऱ्या हव्या आहेत. २०२० मध्ये २४३ पैकी १६७मतदारसंघांत महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते.

एनडीए १६०हून अधिक जागा जिंकेल -पूर्णिया (बिहार) : या विधानसभा निवडणुकीतविरोधी महाआघाडीचा पराभव निश्चित असल्याचे सांगून एनडीए १६०हून अधिक जागा जिंकून बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केला.- पूर्णिया, कटिहार व सुपोल येथे प्रचारसभा घेत शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षातील हे नेते सीमांचल भाग घुसखोरांचा गड करण्यासाठी सरसावले असल्याचा आरोप त्यांनी केला.-  केंद्र सरकार अवैध प्रवाशांची ओळख पटवून त्यांची नावे मतदारयाद्यांतून काढेल. अशांना देशाबाहेर काढेल, असा इशाराही शाह यांनी दिला.रविकिशन अन् तेजप्रताप एकत्रपाटणा : येथील विमानतळावर शुक्रवारी जनशक्ती जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव आणि भाजप खासदार रविकिशन एकत्र दिसले. माध्यमांनी याबाबत विचारले तेव्हा खासदार रविकिशन यांनी 'तेजप्रताप आणि आम्ही भोलेनाथचे भक्त आहोत', असे सांगत अशा भक्तांसाठी भाजपचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar's Record Voting: NDA vs. Grand Alliance, Tight Race

Web Summary : Bihar's first phase saw record 61.78% voting. NDA and Mahagathbandhan claim victory. NDA sees Modi's support; Mahagathbandhan, a change wave. Amit Shah predicts NDA victory with 160+ seats.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५VotingमतदानAmit Shahअमित शाहBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी