शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
3
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
4
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
5
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
6
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
7
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
8
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
9
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
10
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
11
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
12
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
13
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
14
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
15
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
16
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
17
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
18
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
19
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
20
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 21:17 IST

Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता येथील राजकीय पक्षांच्या आघाड्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे. लढवण्यासाठी जागा कमी आणि भागीदार अधिक अशी परिस्थिती असल्याने एनडीएमधील छोट्या मित्रपक्षांच्या वाट्याला अगदीच मोजक्या जागा येत आहेत. त्यामुळे धुसफूस सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये बैठकांवर बैठका सुरू असून, आता भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि हम पक्षाचे जीतनराम मांझी यांची बैठक झाली आहे. मात्र या बैठकीनंतरही मांझी यांची नाराजी कायम आहे. तसेच आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत, असा दावा मांझी यांच्या पक्षाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर जीतनराम मांझी हे काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जीतनराम मांजी हे आपल्या पक्षामधील सर्व नेत्यांना फोन करून कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत त्यांचं मत जाणून घेत आहेत. आता एनडीएमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर जीतनराम मांझी हे १५  ते २० जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवू शकतात.

दरम्यान, बिहारमधील जागावाटपाबाबत आज एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीमध्ये झाली. या बैठकीला अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, मित्रपक्षांच्या जागांची घोषणी ही रविवारी केली जाऊ शकते, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपाचं जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलाससोबत जागावाटप निश्चित झालं आहे. सद्याच्या फॉर्म्युल्यानुसार जेडीयू १०१ ते १०२ जागांवर लढणार आहे. तर भाजपा जेडीयूपेक्षा एक कमी जागा लढवेल. मात्र मांझी यांच्या हम आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या  पक्षाला जागावाटपात फारच कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar NDA seat sharing impasse persists despite BJP, JDU concessions.

Web Summary : Bihar's NDA faces seat-sharing challenges despite BJP and JDU ceding seats. Jitanram Manjhi expresses dissatisfaction, keeping options open. NDA meetings continue, with potential seat announcements expected soon. Manjhi considers fielding candidates independently if disagreements persist.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चा