शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:39 IST

"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.”

अराजक माजवणे, गोळीबार करणे, अशा गोष्टी आरजेडीच्या संस्कृतीचा भाग आहेत. हे त्याच ९० च्या दशकातील आहेत, ज्याचा उल्लेख आम्ही जंगल राज म्हणून करत आहोत, असे म्हणत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आरजेडीवर थेट निशाणा साधला. ते बुधवारी पाटण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. 

राजदवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हटले, “या पक्षाच्या सभांमध्ये ज्या प्रकारे गोंधळ माजतो, यावरून स्पष्टपणे जाणवते की, त्यांची विचारसरणी आणि कार्यपद्धती अजूनही ९० च्या दशकातीलच आहे. त्यांच्या कार्यक्रमांतून अराजकतेचे वातावरण निर्माण होते. असे लोक सत्तेपासून अजून दूर आहेत, जर चुकून सत्तेत आले, तर बिहारमध्ये दहशत माजवतील.”

राहुल गांधींवर निशाणा - यानंतर चिराग पासवान यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही निशाण्यावर घेतले. त्यांनी राहुल गांधींच्या भारतीय सैन्यासंदर्भातील एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देशाच्या विरोधी पक्षनेत्याचीच विचारसरणी अशी असेल की, ते आपल्या सैन्यालाच जाती, धर्माच्या आधारावर विभागू पाहत असतील, तर लोकशाहीसाठी यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. जर तुम्हाला इतकीच चिंता आहे, तर सांगा ना, देशाच्या सत्तेवर दीर्घकाळ कोण होते?”

...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी -पुढे बोलताना पासवान म्हणाले, “जर तुम्हाला खरोखरच सैन्यात जातीनुसार विभागणी करायची होती, तर करायची असती. निवडणुकीच्या काळात समाजात ध्रुवीकरण व्हावे असेच तुम्ही बोलतात. मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Will Be Terrorized if RJD Comes to Power: Paswan

Web Summary : Chirag Paswan criticizes RJD's 'jungle raj' culture, fearing chaos if they gain power in Bihar. He also slammed Rahul Gandhi's remarks on the Indian army, urging respect and caution in political discourse regarding the military.
टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार