Bihar Assembly Election 2020 Result : त्यामुळे बिहारमध्ये एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीएच्या बाजूने अनपेक्षित कल आले

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 14:33 IST2020-11-10T14:31:50+5:302020-11-10T14:33:40+5:30

Bihar Assembly Election 2020 Result News : बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Bihar Assembly Election 2020 Result: Exit polls in Bihar go wrong, unexpected trend on the part of NDA | Bihar Assembly Election 2020 Result : त्यामुळे बिहारमध्ये एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीएच्या बाजूने अनपेक्षित कल आले

Bihar Assembly Election 2020 Result : त्यामुळे बिहारमध्ये एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीएच्या बाजूने अनपेक्षित कल आले

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए १३० तर महाआघाडी १०२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, या कलांमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज साफ कसे चुकले याची चर्चा सुरू झाली आहे. आता याचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.

बिहारमध्ये मतदान झाल्यानंतर आलेल्या काही एक्झिट पोलमधून तेजस्वी यादव यांच्या एकतर्फी विजयाचे भाकित करण्यात आले होते. तर काही एक्झिट पोलनी महाआघाडीला स्पष्ट बहुमताचा कल वर्तवला होता. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनंतर मात्र एक्झिट पोलच्या अगदीच विपरित आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये महाआघाडीऐवजी एनडीएला आघाडी मिळाली आहे. एक्झिट पोलच्या अगदी विरोधात निकाल लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिहारमधील सायलेंट व्होटर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सायलेंट व्होटर किंवा बिहारी भाषेत चुप्पा व्होटर म्हणजे जो मतदार गुपचूप मतदान करून येतो. हा मतदार आपले मत जाहीर करत नाही. तसेच त्याबाबत कुठेही आपली भूमिका जाहीर करत नाही. यावेळी या मतदाराने आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीला मतदान न करता भाजपा-जेडीयूच्या एनडीएला मतदान केले. या मतदारांनी २०१५ मध्ये आरजेडी आणि जेडीयूच्या आघाडीला मतदान केले होते.

२०१५ मध्येसुद्धा एक्झिट पोलमधून भाजपाच्या विजयाचे भाकित करण्यात आले होते. काही एक्झिट पोलनी तर भाजपाच्या एकतर्फी विजयाचा अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये नितीश कुमार आणि लालूंच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता.

सायलेंट व्होटरमध्ये कुणाचा आहे समावेश?

हा सायलेंट व्होटर म्हणजे नेमके कुठले मतदार हा प्रश्न पडू शकतो. तर या सायलेंट व्होटरमध्ये महिला आणि मागास जातींमधील मतदारांचा समावेश होतो. हे मतदार उघडपणे आपलं मत व्यक्त करत नाहीत किंवा त्यांना मत व्यक्त करता येत नाही. मात्र हे मतदार गुपचूप आपले मत देऊन येतात. त्यामुळे त्यांच्या मताचा कल मिळवणे कठीण होते.

Web Title: Bihar Assembly Election 2020 Result: Exit polls in Bihar go wrong, unexpected trend on the part of NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.