भारत-पाकिस्तान दरम्यान खऱ्या युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने गुरुवारी पहाटे भारताच्या १५ शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, एअर डिफेंसने हे हल्ले फोल ठरविले होते. यामुळे चवताळून पाकिस्तानने गुरुवारी रात्री राजस्थान, पंजाब आणि जम्मूमध्ये हवाई दल, लष्कराच्या तळांवर जोरदार ड्रोन आणि लढाऊ विमानांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला आहे.
सीमेवर जोरदार युद्ध सुरु झाले आहे. भारतीय एअर डिफेंस सिस्टिमनी पाकिस्तानला अमेरिकेने दिलेले एफ-१६, तसेच चिनी बनावटीची जेएफ १७ पाडले आहे. तसेच अनेक ड्रोन आणि मिसाईलही हवेतल्या हवेत उध्वस्त करण्यात आली आहेत. भारताच्या रशियन एस ४००, सुदर्शन च्रक, भारतीय बनावटीची एअर डिफेंस सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारताने केलेल्या हल्ल्यात आपण दोन जेएफ-१७ विमाने गमावली याचे आम्हाला दुःख आहे, असे पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआरचे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये काही नवीन अपडेट्स आल्याचे ते म्हणाले. जेएफ-१७ हे विमान पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केले आहे. तथापि, त्यातील ८० टक्के परदेशी आहे.