BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती; आर्मी स्कूलमध्ये अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 12:59 PM2020-10-19T12:59:18+5:302020-10-19T13:02:45+5:30

Govt School Teacher Jobs 2020: कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे 4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा हा आकडा जवळपास 8000 वर जाण्याची शक्यता आहे. 

Big teacher recruitment for BEd holders in Army School; Tomorrow is the last day | BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती; आर्मी स्कूलमध्ये अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती; आर्मी स्कूलमध्ये अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

googlenewsNext

AWES Army School TGT PGT PRT Recruitment 2020: देशातील विविध आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public Schools) वेगवेगळ्या विषयांच्य़ा शिक्षकांसाठी मोठी भरती होणार आहे. आर्मी वेलफेयर एजुकेशन सोसायटी (AWES) ही भरती काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु असून शेवटची संधी आहे. 

पदे 
पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT)
ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT)
म्यूझिक टीचर (PRT)

विषय कोणते? 
इंग्लिश - पीजीटी व टीजीटी
हिन्दी - पीजीटी व टीजीटी
संस्कृत - टीजीटी
मॅथ्स - पीजीटी व टीजीटी
हिस्ट्री - पीजीटी व टीजीटी
जिऑग्राफी - पीजीटी व टीजीटी
इकोनॉमिक्स -  पीजीटी
पॉलिटिकल सायंस - पीजीटी व टीजीटी
फीजिक्स - पीजीटी व टीजीटी
केमिस्ट्री - पीजीटी व टीजीटी
बायोलॉजी - पीजीटी व टीजीटी
बायोटेक्नोलॉजी - पीजीटी
साइकोलॉजी - पीजीटी
कॉमर्स -  पीजीटी
कॉप्यूटर सायन्स/इनफॉर्मेटिक्स - पीजीटी व टीजीटी
होम सायन्स - पीजीटी
फिजिकल एजुकेशन - पीजीटी


कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे   4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा हा आकडा जवळपास 8000 वर जाण्याची शक्यता आहे. 


शिक्षणाची अट काय?
पीजीटीसाठी संबंधित विषयाची मास्टर डिग्री आणि बीएड झालेले असले पाहिजे. तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे. 
टीजीटीसाठी संबंधित विषयामध्ये पदवी आणि बीएड डिग्री, तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे. 


पीआरटीसाठी पदवी आणि बीएड (BEd) किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा डीएलएड (DElEd) किंवा चार वर्षांचा बीएड (Integrated B.Ed) उत्तीर्ण असले पाहिजे. 


1 ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 20 ऑक्टोबर शेवटचा दिवस असून अद्याप अर्ज केला नसल्यास ही शेवटची संधी आहे. परिक्षा २१, २२ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे.

पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार


शुल्क
सर्व जागांसाठी ५०० रुपये शुल्क आकारले जात आहे. 

लिंक 
Army School Teacher Notification 2020 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Read in English

Web Title: Big teacher recruitment for BEd holders in Army School; Tomorrow is the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.