छत्तीसगडमधील बस्तर भागात गेल्या ७२ तासांपासून सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३० माओवाद्यांना ठार केले आहे. या गोळीबारात, जवानांनी एका कुख्यात माओवाद्यालाही ठार मारले आहे. या माओद्याच्या डोक्यावर दीड कोटी रुपयांचे बक्षीस होते. या माओवादी नेत्याचे नाव बसव राजू आहे. त्यांनी १९७० पासून देशात माओवादी चळवळ सक्रिय ठेवली होती.
नक्षलवादी प्रमुख नंबला केशव राव उर्फ बसवा राजू उर्फ गगन्ना, याच्या डोक्यावर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याला जिल्हा राखीव रक्षकच्या जवानांनी ठार मारले आहे. पोलिसांनी सुमारे ३० नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी कारवाई अजूनही सुरू आहे. नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमदला नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी देखील म्हटले जाते.
सुरक्षा दलांनी चकमकींद्वारे या अबुझहमदमध्ये नक्षलवादाला मोठा धक्का दिला आहे. नक्षलवादी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला संपवणे ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे. या चकमकीत मारल्या गेलेल्या ३० नक्षलवाद्यांमध्ये अनेक सीसी सदस्यही मारले गेल्याचे वृत्त आहे. या चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे, पण त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या चकमकीत एक पोलिस अधिकारीही शहीद झाला.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या काही भागांत मागच्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांकडून धडाकेबाज मोहिमा सुरू आहेत. या कारवाईच्या माध्यमातून अनेक भागातून नक्षलवाद्यांना हुसकावून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहेत. तसेच या चकमकींमध्ये अनेक नक्षवलादी मारले जात आहेत. दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे.