शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Captain Amrinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंगांचे मोठे वक्तव्य! 'अपमान झाला, काँग्रेसमध्ये राहणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:25 IST

Captain Amrinder Singh talk about AAP and BJP: अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.

Punjab Congress Fight: पंजाबमध्ये राजकीय दंगल थांबण्याचे नाव घेत नाहीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांनी (Amrinder Singh) मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (I will left congress; Amrinder Singh talk about AAP and BJP.)

अमरिंदर सिंगांनी सांगितले की, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. अशाप्रकारचा अपमान मी सहन करणार नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलवून एनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असे ते म्हणाले. नवज्योत सिंग सिद्धूवर त्यांनी टिपण्णी करताना म्हटले की, सिद्धू टीम प्लेअर नाहीय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी टीम प्लेअरची गरज आहे.

 

पंजाबमध्ये काँग्रेसची लोकप्रियता घटत आहे हे मी स्वीकार करतो, तिथे आपची लोकप्रियता वाढू लागली आहे. यावेळची पंजाब निवडणूक खूप वेगळी असणार आहे. कांग्रेस-अकाली दल पहिल्यापासूनच इथे आहेत. आता आम आदमी पार्टीदेखील वाढू लागली आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंगांनी शाहांनंतर घेतली डोवालांची भेटअमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला. पंजाबमध्ये सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले होते. विरोधी आमदारांना गोळा करून त्यांनी कॅप्टनना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. तेव्हा कॅप्टननी सिद्धू यांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध असून ते आपल्याला महागात पडतील असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता.

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपाAAPआप